Thursday, May 9, 2024
Homeनगरकर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा

कर्जतमध्ये किराणा मालाची चढ्या दराने विक्री; उठाबशा काढण्याची शिक्षा

कर्जत (प्रतिनिधी)-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना कर्जत तालुक्यातील किराणा दुकानदारांकडून चढ्या दराने मालाची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. त्याची कर्जतचे तहसीलदार सी.एम.वाघ यांनी तात्काळ दखल घेतली. दुकानाला भेट देत दुकानदाराला तोंडी समज व उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. पुन्हा चढ्या दराने विक्री करणार नाही असे वधवून घेत दुकानदाराला सक्त ताकीद दिली.

कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील दुकानदार चढ्या दराने किराणा मालाची विक्री करत असल्याची तक्रार तहसिलदारांना प्राप्त झाली. त्यावर तहसिलदारांनी त्या दुकानात डमी ग्राहक पाठवून शहानिशा केली. तक्रारीत तथ्य आढळून आल्याने दुकानदारावर कारवाई केली. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तालुक्यातील काही दुकानदारांनी ग्राहकांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे अशा दुकानदारांचा शोध घेऊन कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सी.एम वाघ यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या