Friday, April 26, 2024
Homeनगरकर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन

कर्जत तालुक्यातील ‘ते’ आठ जण होम क्वारंटाईन

कर्जत (प्रतिनिधी)- कर्जतमधील आठ नागरिकांना नगर येथे जिल्हा रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पुंड यांनी दिली आहे.

सध्या संपूर्ण देशामध्ये दिल्ली येथील निजामुद्दीन मस्जिद मधून काही विदेशी नागरिक नगर जिल्ह्यातील जामखेड येथे धर्मप्रसारासाठी आले होते. यामधील तीन नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

शासन आता या सर्व नागरिकांच्या संपर्कात आलेले किंवा जामखेड येथे ते त्या मजिदीमध्ये कुठून आले होते. त्यांची नावे आणि शोध सुरू केला आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील आठ जण जामखेड येथे त्या कालावधीमध्ये गेले होते अशी माहिती प्रशासनाला उपलब्ध झाली. त्यानुसार तालुक्यातील आठ जणांना जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले आहेत.

यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पुंड यांनी माहिती दिली की या सर्वांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक असणारे सर्व तपासण्या झाले आहेत. परंतु कोरोना बाबत असणारी लक्षणे यांच्यामध्ये आढळून आले नाहीत. यामुळे त्यांना पुन्हा त्यांच्या घरी आणून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या