करंजीघाटात डिझेलचा टँकर उलटला; 24 हजार लिटर डिझेल गेले वाहून

jalgaon-digital
2 Min Read

करंजी (वार्ताहर)- पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबईहून परभणीकडे चोवीस हजार लिटर डिझेल भरून निघालेला टँकर एमएच 46 बीबी 5326 हा करंजी घाट उतरत असतांना टँकरचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने टँकर रस्त्याच्याकडेला उलटला असुन टँकरमधील चोवीस हजार लिटर डिझेल अक्षरषा पाण्यासारखे रस्त्याने वाहत होते. वाहुन जाणारे डीझेल भरण्यासाठी तरूणांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केली होती या अपघातामध्ये चालक बाळासाहेब गर्जे रा पाटसरा ता आष्टी हा किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबतची सविस्तर माहीती अशी की रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन परभणी कडे जात असलेला डिझेलने भरलेला टँकर करंजीघाट उतरत असताना माणिकशहॉ पीरबाबा दर्गा येथील धोकादायक जवळ या टँकरचे ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे टँकर स्त्याच्या कडेला उलटला त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये टँकर मधील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहू लागले. टँकर पलटी झाल्याची माहिती समजताच करंजी, दगडवाडी, भोसे ,मराठवाडी, हारेवाडी येथील तरुणांनी हातामध्ये ड्रम ,दुधाचे कॅन आणून टँकरमधून वाहून जाणारे डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली.

या महामार्गावरुण प्रवास करणारे अनेक पन्नासहुन अधिक मोटारसायकलस्वार रस्त्यावर सांडलेल्या डिझेलमुळे अपघातग्रस्तहुन अनेकजण जखमी देखील झाल्याची घटना घडली. थोड्याच वेळात याठिकाणी पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, पोलीस हवालदार बाबासाहेब जंबे, पोलीस सतीश खोमणे, महामार्ग विभागाचे सहाय्यक फौजदार शेषराव गोल्हार ,भांड, काळे ही घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी डिझेल घेवून जाणार्‍या तरुणांना काठीचा प्रसाद देत काही वेळातच घाटातील वाहतूक सुरळीत केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *