Thursday, April 25, 2024
Homeनगरजामखेड: खर्डा येथे दारु अड्ड्यांवर छापा

जामखेड: खर्डा येथे दारु अड्ड्यांवर छापा

44 हजाराचा ऐवज जप्त; दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी
जामखेड (तालुका प्रतिनिधी)- खर्डा येथे खुलेआम अंधारातून हातभट्टी दारू विक्री होत असताना जामखेड पोलिसांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळताच कर्जतचे पोलीस उपधीक्षक संजय सातव व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील कोरोना संसर्ग आजार संदर्भात खर्डा गावात पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉ. भिताडे, पोलीस कॉ. साखरे यांना गुप्त बातमीदार यांच्यामार्फत पोलिसांनी निर्मला लहू पवार (वय 41) यांच्या राहत्या घरी छापा टाकून 32 हजार किमतीचा 800 लिटर कच्चे रसायन प्लास्टिक चार बॅरलमध्ये आढळून आले.
तर पाच हजार किंमतीचे 50 लीटर गावठी हातभट्टी तयार दारू, असा एकुण 32 हजार रूपये किमतीचा मालावर छापा टाकला. तर कोष्टी गल्ली येथे अविनाश बाजीराव काळे यांच्या घरावर टाकला. येथे 1200 हजार किमतीचा माल 300 लिटर कच्चे रसायन तीन प्लास्टिक बॅरलमध्ये हातभट्टी दारू बनविली जात असताना छापा टाकून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे, असा दोन्ही आरोपींचे गावठी हातभट्टी दारूचा एकुण 44 हजाराचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे.
कोरोनामुळे जामखेड तालुक्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना शहरसह दोन किमी अंतरावर हॉटस्पॉट घोषित केला असुन सर्व बंद तर खर्डा शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून खर्डा येथे खुल्लेआम हातभट्टी दारू विक्री चोरून जोरात सुरू होती. यांचा सुगावा पोलिसांना लागताच पोलिसांनी खर्डा येथे जाऊन दोन वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्टी दारू विक्री करणार्‍यावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी खर्डा येथील दोन्ही आरोपींना जामखेड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जामखेड शहरासह तालुका प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी मोठी खबरदारी घेत आहे.
जीवितास विषबाधा व धोका निर्माण होईल याची जाणीव असताना देखील कच्चे रसायन वापरून दारू विक्री केली जात आहे. या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीर बाळगल्या प्रकरणी पोलीस हेड. कॉन्स्टेबल आप्पासाहेब कोळेकर व पोलिस कॉ. नमिता पवार उपविभागीय कर्जत यांच्या फिर्यादीवरून आरोपी निर्मला पवार खर्डा व दुसरा आरोपी अविनाश पवार कोष्टी गल्ली खर्डा यांच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईच्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस हे.कॉ. भिताडे, पो.कॉ. साखरे यांच्यासह आदीचा समावेश होता पुढील तपास पो. हे. कॉ. भिताडे करत आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या