Type to search

जामखेड : फक्राबाद येथील घटना ही केवळ अफवा – डॉ युवराज खराडे

Share
नागरीकांनी घाबरून जाऊ नये 
जामखेड (तालुका प्रतिनिधी)-  तालुक्यातील फक्राबाद येथील एक कोरोनाचा रुग्ण अढळुन आला अशी अफवा पसरली होती. मात्र ती केवळ अफवाच आसुन नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ती व्यक्ती रुग्ण नसुन त्याची तब्येत ठणठणीत आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य केले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे एक व्यक्ती परदेशातुन आपल्या गावी आला होता. मात्र त्या व्यक्तीला कोरोना झाला आसल्याची अफवा तालुक्यात पसरली मात्र ती व्यक्ती सध्या ठणठणीत आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने जामखेड तालुक्यातील व्यापाऱ्यांनी स्वतः दुकाने बंद केली आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!