Saturday, April 27, 2024
Homeनगरजामखेडमधील आणखी दोन व्यक्तिंना करोना

जामखेडमधील आणखी दोन व्यक्तिंना करोना

 बाधितांची संख्या आता 40
अहमदनगर (प्रतिनिधी)- जामखेड येथील करोना रुग्णाच्या संख्येत शुक्रवारी आणखी दोन व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरूवारी पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या 14 झाली आहे.
बुधवारी करोना बाधीत आढळलेल्या 2 व्यक्तींचे हे दोन्ही मित्र असून त्यांना लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधीत व्यक्तींची संख्या आता 40 झाली आहे. त्यापैकी 24 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये 12 रुग्ण असून या दोघांना आता तिकडे हलविण्यात येणार आहे. काल बाधीत आढळलेल्या व्यक्तींपैकी एक जण 23 वर्षांचा तर दुसरा 16 वर्षांचा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले करोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांना बुधवारी लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर काल त्या दोन व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना तर आज त्यांच्या दोन मित्रांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
राहुरी, अकोले, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगावात एकही रुग्ण नाही
सध्याच्या परिस्थितीला तर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 37 पर्यंंत पोहोचली आहे. पण त्यातही दिलासादायक गोष्ट म्हणजे अद्यापही कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, अकोले या सात तालुक्यांमध्ये करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नियमित मास्कचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे अशा काही उपाययोजनांचा हा परिणाम आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या