इस्रोच्या चंद्रयान-3 मोहिमेला केंद्राची परवानगी

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली – इस्त्रो 2020 मध्ये गगनयान आणि चांद्रयान-3 मोहीम लॉन्च करणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली असल्याचं इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसंच गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. अवकाश विज्ञानाच्या सहाय्याने आम्ही देशवासियांचं जीवनमान अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.

2020 मध्ये आम्ही चांद्रयान-3 लॉन्च करणार आहोत. गगनयानच्या अंतराळवीरांना जानेवारीच्या महिन्याच्या तिसर्‍या महिन्यापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचं गठन करण्यात आलं आहे. 2019 मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे, अशी माहिती सिवन यांनी दिली आहे.

चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मध्ये साम्य
चांद्रयान-3 मोहीमेत आणि चांद्रयान-2 मध्ये बरंच साम्य आहे. मोहिमेवर काम सुरु झालं आहे. याचं कॉन्फिगरेशन चांद्रयान-2 प्रमाणेच असेल. यातही लँडर आणि रोव्हर असणार आहे असे इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी सांगितले.

तामिळनाडूत होणार देशातील दुसरं स्पेस पोर्ट
के सिवन यांनी देशात उभ्या राहणार्‍या दुसर्‍या स्पेस पोर्टबद्दलही यावेळी माहिती दिली. स्पेस पोर्टसाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे स्पेस पोर्ट तामिळनाडू येथील तुतुकुडी येथे उभारण्यात येणार आहे. आगामी काळात इस्रो मंगळ ग्रहापासून ते शनी ग्रहापर्यंत अनेक महत्त्वाच्या मोहीमांवर काम करणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इस्रो रशियाची मदत घेणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *