Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

इंदोरीकर महाराज यांची अखेर दिलगिरी

Share
इंदोरीकर महाराज यांची अखेर दिलगिरी, Latest News Indorikar Maharaj Sorry Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- अपत्यप्राप्तीसाठी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. इंदोरीकर महाराज यांनी पत्रक जाहीर करून दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ओझर इथे आपल्या किर्तनात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या प्रकरणी अहमदनगरच्या झउझछऊढ समितीने त्यांना नोटीस पाठवली आहे. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून झउझछऊढ कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचं समितीच्या सदस्याने म्हटलं आहे.

मागील आठ दिवसांपासून या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले आहेत. मात्र प्रकरण आणखी जास्त चिघळण्याआधी इंदोरीकर महाराज यांनी दिलगिरी व्यक्त करत, यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

या पत्रकात इंदोरीकरांनी काय लिहिलं ?
महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व मातासमान असलेला तमाम महिला वर्ग. आज गत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटना, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!