Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

इंदोरीकर महाराजांची बदनामी; पुणे सायबर सेलकडे गुन्हा

Share
इंदोरीकर महाराजांची बदनामी; पुणे सायबर सेलकडे गुन्हा, Latest News Indorikar Maharaj Pune Cyber ​Cell Action Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची बदनामी करणारे व्हिडीओ ‘यू ट्यूब’सह इतर सोशल मीडियावर पोस्ट करणा़र्‍यांविरोधात पुणे सायबर सेलकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचा वाद : महिला नेत्यांमध्येच जुंपली

गर्भलिंग निदान वक्तव्यामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेले कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. येत्या चार दिवसांत इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाही तर अकोला येथे जाऊन त्यांना महिला कार्यकर्त्या काळे फासतील असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

तर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आता तृप्ती देसाई यांनाच आव्हान दिले आहे. आता हे खूप अति होतंय, तू येच ग शृपनखा, कोणाच्या तोंडाला काळे फासले जाते ते बघ तुझ्या उघड्या डोळ्यांनीच. तू काळं फासायला आलीस तर आम्हीच एक लाख रुपये देऊ तुला. असे खुले आव्हान पाटील यांनी दिले आहे.

तसेच सदसदविवेकबुद्धीने धर्माचा प्रचार करत एखादा दाखला दिला तर त्यासाठी गुन्हा दाखल करण्याची काहीच गरज नसते. असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. या सर्व वादामुळे आता मात्र इंदुरीकर विरुध्द देसाई नव्हे तर रुपाली पाटील ठोंबरे विरुध्द तृप्ती देसाई असा सामना आता रंगणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तृप्ती देसाईंविरोधात तक्रार
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्याच देसाई यांच्या विरोधात आता कोथरूडमध्ये महिलेने पोलिसांत धाव घेतली असून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता कोथरूड पोलीस काय पवित्रा घेतात हेच बघावे लागणार आहे. अनुराधा पाटील असे तक्रार देणार्‍या महिलेचे नाव आहे.

इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी दाखवले काळे झेंडे
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचे मंगळवारी नगरमध्ये आगमन झाले. यावेळी सुपा येथे त्यांना इंदोरीकर महाराजांच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!