Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

इंदोरीकर महाराजांना किर्तनस्थळी अंगरक्षकांचे कवच

Share
इंदोरीकर महाराजांना किर्तनस्थळी अंगरक्षकांचे कवच, Latest News Indorikar Maharaj Kirtan Bodyguard Ahmednagar

अहमदनगर – ‘सम-विषम’च्या वक्तव्यानंतर वादात सापडलेले निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) हे आज पहिल्यादांच नगरात आले. नगरमधील भिंगार उपनगरात आज शनिवारी सकाळी त्यांचे किर्तन झाले. किर्तनासाठी महाराज बॉक्सरच्या कोंड्यात किर्तनस्थळी पोहचले. यावेळी शुटींगलाही बंदी घालण्यात आली होती.

इंदुरीकर महाराज भिंगारला येणार की नाही याचीच उत्सुकता होती. मात्र महाराज आले. येताक्षणीच त्यांच्या गाडीभोवती बॉक्सरचे कोंडाळे उभे राहिले. या कोंडाळ्यातच महाराज शुक्लेश्वर मंदिरातील सप्ताहातील किर्तनस्थळी पोहचले.किर्तन चालु करण्यापूर्वीच आयोजकांनी शुटिंगला बंदी घातल्याचे स्पीकरवर पुकारले.

शुटींगचे कॅमेरे जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत किर्तन सुरू होणार नाही, असंही बजावले. शुटिंगचे कॅमेरे काढल्यानंतर कीर्तन सुरू करण्यात आले. वादाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. महाराजांच्या किर्तनासाठी भिंगारकरांसह नगरकरही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!