Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

मोदीजी मी पायी चालू शकतो की त्यावरही बंदी, कुणाल कामरांचे ट्विट

Share
मोदीजी मी चालू शकतो की त्यावरही बंदी, कुणाल कामरांचे ट्विट Latest News IndiGo, Air India Now Banned Spice Jet for Kunal Kamra for Six Months

मुंबई : स्टँड-अप कॉमेडिअन कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्स, एअर इंडियाने बंदी घातल्यानंतर आता स्पाईस जेट या विमान कंपनीनेही बंदी घातली आहे. यावर कुणाल कामरा याने ट्विट करीत मोदीजी मी चालू शकतो कि त्यावरही बंदी आहे असा खोचक सवाल त्याने केला आहे.

दरम्यान पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात अपशब्द वापरल्याप्रकरणी हि बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मागील दोन दिवसांपूर्वी कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी इंडिगोच्या विमानात प्रवास करत होते. तेव्हा कामरा यांनी गोस्वामी यांच्या पत्रकारितेवर टीका केली होती. त्यानंतर इंडिगोसह एअर लाईन्सने देखील कुणाल कामरा यांच्यावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे.

आता स्पाईस जेट या विमान कंपनीनेही नोटीस मिळेपर्यंत विमान प्रवास करण्यात सक्त मनाई केली आहे. या ट्विटला रिट्विट करीत कुणाल कामरा यांनी मी चालू शकतो कि त्यावरही बंदी आहे, असा प्रश्न मोदी याना विचारला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!