सलमान म्हणाला लडकी मिल गई; पाहायचीय कोण आहे ती?

0

अभिनेता सलमान खानच्या चार शब्दांच्या एका ट्विटने फारच धमाल उडवून दिली. त्याने लिहिले की ‘मुझे लडकी मिल गई’

सलमानचे लग्न कधी होणार? अशी उत्सूकता वाटणाऱ्या त्याच्या चाहत्यांना वाटले की याला लग्नासाठी भावी नवरी मिळाली, असेल.

त्यांनी तसे अभिनंदनही केले. पण अनेकांनी मात्र इथेही सलमानची खोडी काढली. कारण सलमानने आता वयाची पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे ‘लडकी नही, आंटी होगी’ अशी खोचक कॉमेंटही सलमानला मिळाली.

एकाने तर तिला ड्रायव्हिंग शिकवा भाऊ असा शालजोडीतला दिला आहे.

दरम्यान ही मुलगी आपल्याला गर्लफ्रेंड किंवा लग्नाची वधू या नात्याने मिळालेली नसून आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी मिळाली आहे, असे त्याने पुन्हा आज दुपारी ट्विट केले.

वरिना असे या अभिनेत्रीचे नाव असून आयशा शर्माच्या नव्या चित्रपटात वरिना आणि सलमान एकत्र झळकणार आहे. लवरात्री असे चित्रपटाचे नाव असणार असे खुद्द सल्लूभाईंनीच जाहीर केलेय.

 

LEAVE A REPLY

*