IPL Blog : ईडन गार्डन्सवर कोलकाता संघ चमकणार का?

कोलकाता वि. हैद्राबाद, स्थळ : ईडन गार्डन्स, कोलकाता, वेळ, रा. ८ वा.

0
ज शनिवार दिनांक १४ एप्रिल राजी दोन वेळचा आईपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स आपल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैद्राबादच्या तगड्या आव्हानाला सामोरा जाणार आहे. हैद्राबाद व कोलकाता या दोन संघांबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघांचे २ सामने झालेले असून हैद्राबाद संघाने  २ सामने जिंकून अव्वल स्थान गाठले आहे, तर कोलकाता संघ अंकतालिकेत ९ विजय व  १ पराभव यासह चौथ्या स्थानावर आहे.
हवामानाचा अंदाज : या दिवशी हवामान स्वच्छ राहिल असा खात्याचा अंदाज आहे.

कोलकाताचे फलंदाज : लिन, रसेल, नारीन, नितीश राणा, रिंकू सिंग

अष्टपैलू :  पीयूष चावला, रसेल

गोलंदाज : विनय कुमार, कुलदीप यादव, पीएस चावला, सुनील नारायण

कमजोर बाजू : लिनचा खराब फॉर्म

उजवी बाजू : नरिन आणि रसेल फॉर्मात

सनरायझर्स हैद्राबाद

प्रमुख फलंदाज : धवन, विल्यमसन, साहा, मनीष पांडे, शकीब अल हसन

अष्टपैलू : शकीब अल्‌ हसन, क्रिस जॉर्डन, कार्लोस

गोलंदाज : सिद्धार्थ कौल, बिली, स्टॅनली, अल हसन, राशीद खान, संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार

जमेची बाजू : रशीद खान, धवन फॉर्मात

कमजोर बाजू : युसूफ शकीब, मनीषकडून मोठी खेळी अपेक्षित.

दोन्ही संघात आजवर झालेल्या लढतीचा विचार करता कोलकाताने हैद्राबादबादवर सर्वाधिक विजय संपादन केलेले आहेत. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. यात कधीही काही घडू शकते. ही लढत ईडन गार्डन्सवर होणार असल्याने साहजिकच कोलकाताचे पारडे जड मानले जाते.

– सलील परांजपे

 

LEAVE A REPLY

*