IPL Blog : आज ईडन गार्डन्सवर काय होणार दिल्लीचे

0

डन गार्डन्स कोलकातावर आज रात्री ८ पासून आयपीएलचा १३वा सामना होणार आहे. दोन वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्सचा संघ, दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान पेलण्यास सज्ज झाला आहे.

सन२०१२  व २०१४ रोजी गौतम गंभीरच्या नेतृत्वात त्यांनी किताबावर आपले नाव कोरले होते. मात्र यंदा कोलकाता संघाने दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात पुन्हा किताबावर नाव कोरण्याचे मनसुबे आखले आहेत. दोन्ही संघाचे आतापर्यंत ३ सामने झाले असून दोघे समान दोन गुणांवर आहेत.

त्यामुळे कोलकाता संघ मागील दोन पराभव विसरून पुन्हा विजयी ट्रॅकवर येण्यास उत्सुक आहेत. तर दुसरीकडे जेसन रॉयच्या झंझावाताने दिल्ली संघाने मुंबईवर दणक्यात विजय मिळवला होता.  आता त्यांचा प्रयत्न आपली लय कायम राखण्याचा आहे.

 • हे दोन्ही संघ आतापर्यत आमनेसामने : २९ वेळा
 • कोलकाता विजयी : १४
 • दिल्ली विजयी :
 • अनिर्णित :
 •  ईडनवर आतापर्यंत ७ सामने, पैकी कोलकाता विजयी ६, दिल्ली विजयी १

हवामानाचा अंदाज : आकाश निरभ्र राहिल.

 • प्रमुख खेळाडू (दिल्ली) : गौतम गंभीर, जेसव रॉय, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर
 • अष्टपैलू : ग्लेन मॅक्सवेल, क्रीस मॉरिस,  विजय शंकर
 • गोलंदाज : शाहबाझ नदीम, अमित मिश्रा, मॉरीस, मो. शमी, मॅक्सवेलचाही उपयोग होऊ शकतो.
 • कोलकाताचे प्रमुख खेळाडू  : क्रीस लीन, सुनील नरेन, नितीश राणा, आंद्रे रसेल, मिशेल जॉनसन
 • अष्टपैलू : आंद्रे रसेल, पीयूष चावला, नरेन
 • गोलंदाज : मिशेल जॉनसन, सुनील नारायण, शिवम  मावी, विनय कुमार, कुलदीप यादव, पीयुष चावला.

खेळपट्टीचा : यंदाच्या स्पर्धेत आजवर पार पडलेल्या सामन्यात सर्व कर्णधारांची पसंती प्रथम गोलंदाजीला होती. कोलकाता संघाचे रेकॉर्ड पाहता सर्वांची नजर गौतम गंभीरकडे खिळलेली असून कोलकाता समर्थकांना माजी कर्णधाराला पाहण्याची संधी मिळणार आहे.

-सलील परांजपे

LEAVE A REPLY

*