एका वेगळ्या रूपात अमिताभ आणि ऋषिकपूर २७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र

0

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनयातील दिग्गज ऋषी कपूर हे दोघेही तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र काम करत आहेत.

वयोवृद्धांच्या भूमिकेत ते आपणल्याला दिसतील. दोघांच्याही यात वैशिष्ट्यपूर्ण भूमिका असून एका वृद्धाश्रमातील आयुष्यावर आणि तेथील लोकांवर आधारित हा चित्रपट आहे.

चित्रपटाचे नाव आहे, ‘१०२ नॉट आऊट’. या चित्रपटात मुलगा आणि वडील यांच्या नात्यावर प्रकाशझोत टाकला आहे. सौम्या जोशी यांचे दिग्दर्शन असून येत्या ४ मे दरम्यान हा चित्रपटा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर दोघांनीही वयोवृद्धांच्या भूमिका केल्या असल्या तरी यावेळेस ते दोघेही पडद्यावर वृद्धांच्या रूपात मस्ती करणार आहेत.

यापूर्वी अमिताभ आणि ऋषी कपूर हे दोघेही अजूबा या चित्रपटात ९१ साली शेवटचे एकत्र आले होते. या चित्रपटाचा टिझर सोनी पिक्चर्सतर्फे नुकताच प्रदर्शित झाला आहे.

LEAVE A REPLY

*