Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

एका बाटलीमुळे वाचले 40 फूट खोल दरीत अडकलेल्या कुटुंबाचे प्राण

Share

वृत्तसंस्था:

माणसावर कधी कोणता प्रसंग ओढवेल हे सांगता येत नाही. असाच काहीसा विचित्र प्रसंग अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये घडला आहे. एका 40 फूट खोल दरीत अडकलेल्या कुटुंबाचे प्राण चक्क एका प्लास्टिकच्या बॉटलमुळे वाचले आहेत. कर्टिस विटसन त्यांची पत्नी आणि त्यांचा 13 वर्षांचा मुलगा हे कॅलिफोर्निया येथे फिरायला आले होते.

दरम्यान, एका दरीतून, अरोयो सेको नदीजवळ आणि तेथून झऱ्यापर्यंत जाणार होते. मात्र प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी ते दोन्ही बाजूला 40 फूट उंचच उंच भिंती असलेल्या दरीत अडकले. त्यांच्याकडे बाहेर निघण्यासाठी कोणतेही साधन नव्हते.

कर्टिस यांना सुरूवातीला काहीही सुचत नव्हते. आपल्या परिवाराचे आता काय होईल हा प्रश्न त्यांना सतावत होता. सोबतीला खाण्यासाठी कुठलेही अन्न त्यांच्या जवळ नव्हते. नंतर मात्र त्यांना बाटलीवर ‘हेल्प’ असे लिहले व त्या खाली लिहले की, ‘आम्ही येथे एका दरीत अडकलो आहोत. आमची मदत करा.’ हा संदेश लिहित बाटली पाण्यात टाकत झऱ्याच्या प्रवाहात त्यांनी सोडली.

कर्टिस यांनी टाकलेली ही बाटली सुमारे 400 मीटर दूर वाहत जाऊन हायकर्सच्या एका ग्रुपला सापडली. त्यानंतर या ग्रुपने कर्टिस यांच्या कुटुंबाचा शोध घेत त्यांना वाचवले. कर्टिस सांगतात की, ते तब्बल 4 तास त्या दरीत अडकले होते. आमचे नशीब चांगले होते की, आमची बाटली कोणाला तरी सापडली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!