Type to search

Featured नाशिक

साडेपाच लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Share

नाशिक । प्रतिनिधी

पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर कारवाई करीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने 5 लाख 69 हजार 660 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. तसेच या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

अविनाश भामरे आणि राहुल गांगुर्डे (दोघे रा. पिंपळगाव बसवंत) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक 2019 ची आचारसंहिता चालू असून विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी मद्याचा वापर होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कार्यान्वित आहेत.

या पथकांकडून अवैध मद्य वाहतूक, विक्री व साठा करणार्‍यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव टोलनाक्यावर कारवाई केली. टोलनाक्यावर आलेेल्या (एमएच 15 जीआर 7916) क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याच्या 137 बाटल्या आढळून आल्या.

या मद्याची किंमत 5 लाख 69 हजार 660 रुपये इतकी आहे. त्यामुळे पथकाने अविनाश भामरे आणि राहुल गांगुर्डे या दोघा संशयितांना अटक केली. भरारी पथकाचे निरीक्षक एम. एन. कावळे, दुयम निरीक्षक एस. बी. शिंदे, जवान सोमनाथ भांगरे, विष्णू सानप, महेंद्र भोये, महेश खामकर, साक्षी महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!