Friday, April 26, 2024
Homeनगरबेकायदेशीर गॅस टाक्यांवर शहर पोलिसांचा छापा

बेकायदेशीर गॅस टाक्यांवर शहर पोलिसांचा छापा

एक लाख 71 हजारांच्या 18 टाक्या जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा साठा करून बाजारात चढ्या भावाने विक्री करणार्‍यावर शहर पोलीसांनी छापा टाकून एक लाख 71 हजार 850 रूपये किंमतीच्या 18 गॅस टाक्या जप्त केल्या आहे.  शहर पोलीसांनी ही कारवाई गुरूवारी (दि. 9) दुपारी अडीचच्या सुमारास मुकुंदनगर परिसरात केली. सय्यद जिशान आरीफ (वय- 32 रा. फकीरवाडा), जावेद आमीश सय्यद (वय- 41 रा. ख्रिस्त गल्ली) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मुकुंदनगर परिसरातील लक्ष्मी आटा ट्रेडिंग कंपनीचे आवारात बेकायदेशीररित्या गॅस टाक्यांचा साठा केला असून काही इसम त्याची विक्री बाजारात चढ्यादरांनी करत असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपाधीक्षक मिटके, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पुरवठा अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी लक्ष्मी आटा कंपनीच्या आवारात छापा टाकला.

या छाप्यात पोलीसांनी 18 गॅस टाक्या जप्त केल्या. सय्यद आरीफ, जावेद सय्यद यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पुरवठा अधिकारी, सहायक फौजदार गायकवाड, पोलीस नाईक सुद्रिक, कुलांगे, द्वारके यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या