Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी : रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

Share
इगतपुरी : रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू, Latest News Igatpuri One Died Under Train Near Titoli Shiwar

इगतपुरी : टिटोली शिवारात मुंबईला जाणाऱ्या अज्ञात रेल्वेखाली खाली सापडुन एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यु झाला आहे.

दरम्यान अधिक माहिती अशी कि टिटोली शिवारात हि घटना घडली असून अद्याप इसमाची ओळख पटलेली नाही. सदर इसमाचे वय अंदाजे ३२ वर्ष असुन या अपघातात त्याचे हात व पाय कापले गेले असुन डोक्यावरही मोठ्या जखमा आढळुन आल्या. सदर इसमाची ओळख पटलेली नसुन रंगाने गोरा असुन अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाचा हाफ बरमोडा, उंची साडे पाच फुट, अंगाने सडपातळ आहे.

या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. बी. कोळी व महीला पोलीस हवालदार कल्पना जगताप आदी करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!