Type to search

Featured हिट-चाट

ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’चे पहिले पोस्टर रिलीज

Share

मुंबई | प्रतिनिधी

आपल्या खास डान्स आणि अँँक्शनसाठी सुप्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोघेही ओळखले जातात. गेल्या अनेक वेळेपासून त्यांच्या ‘वॉर’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरहि आता रिलीज करण्यात आले आहे.


या चित्रपटात दोन सुपरस्टार ऋतिक आणि टायगर श्रॉफ एकत्र येणार असल्याचे माहित झाल्यापासून त्यांच्या चाहत्यांना एकच उत्सुकता लागून राहिली आहे. टीझरमध्ये हा एक अँँक्शनपट असल्याची झलक पाहायला मिळाली होती. टायगर हा ऋतिकला आपला प्रेरणास्रोत मानतो. पण, चित्रपटात दोघेही एकमेकांना टक्कर देताना पाहायला मिळतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद हे करत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!