Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगर शहरात दुसरा हॉटस्पॉट

नगर शहरात दुसरा हॉटस्पॉट

झेंडीगेट : किराणा दुकान, भाजीपाला अन् मेडिकलही 27 मे पर्यंत बंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी झेंडीगेट हॉटस्पॉट केंद्र जाहीर करत निर्बंध घातले आहेत. या निर्बंधानुसार या भागात आता किराणा दुकान, भाजीपाला, मेडिकल सारख्या अत्यावश्यक सेवाही बंद राहणार आहेत. 27 मेच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. या भागात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी झेंडीगेट केंद्रबिंदू मानून त्या परिसरातील दोन किलोमीटर एरिया कोरोना एरिया घोषित केला आहे. हा भाग बॅरीकेट, बाबू बांधून सील करण्यात आला आहे.

- Advertisement -

झेंडीगेट परिसरातील 70 वर्षीय महिलेस कोरोनाची लागन झाली. त्यानंतर तिच्या संपर्कातील 56 संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. काल बुधवारी त्यातील चार स्त्राव कोरोना पॉझिटिव्ह निघाले. एकाच वेळी चौघांना कोरोना झाल्याने अन् बाधितांची संख्या पाच झाल्याने कलेक्टरांनी तातडीने मिटिंग घेत झेंडीगेट परिसर हॉटस्पॉट जाहीर केला. या ाागातील लोकांना बाहेर ये-जा करण्यास मनाई करण्यात आली असून वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. पूर्वी मुुकुंदनगर हा ााग तीन आठवडे हॉटस्पॉट होता. गत 24 एप्रिल रोजी हॉटस्पॉट रद्द झाले. त्यानंतर आता झेंडीगेट परिसरात कोरोनाने हातपाय पसरल्याने हा भाग हॉटस्पॉट झाला आहे.

हा भाग हॉटस्पॉट
रामचंद्र खुंट, पोखरणा हॉस्पिटल, झेंडीगेटचौक, मनपा प्रााग कार्यालय, आंबेडकर चौक, जुने तालुका पोलीस ठाणे, कलेक्टर ऑफिसची उत्तर-पश्चिम बाजू, हॉटेल कल्याण, डावरे गल्ली, नालबंद खुंट.

- Advertisment -

ताज्या बातम्या