Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

हॉटेल्स, मद्यविक्रेत्यांची तीन दिवस बंद ठेवण्याची तयारी

Share
कर्मचार्‍याला मारहाण झाल्याने अत्यावश्यक सेवा धोक्यात, Latest News Amc Worker Kill Urgent Service Stop Ahmednagar

जिल्हाधिकार्‍यांना भेटणार : गर्दी टाळण्याचे महापालिका आयुक्तांचे व्यापार्‍यांना आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरात गर्दीची ठिकाणे शोधून तेथे गर्दी होऊ नये, यासाठी महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या संदर्भात व्यापारी असोसिएशनसह इतरांशी चर्चा सुरू केली असून, सहकार्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी हॉटेल्स मालक व मद्यविक्रेत्यांच्या बैठकीत आगामी काही दिवसांसासाठी व्यवहार बंद ठेवण्याची तयारी दर्शविण्यात आली. मात्र या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या वातावरणामुळे जिल्हा व महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात महापालिकेने यासाठी काही कठोर भूमिका घेतानाच गर्दी टाळण्यासाठी विविध संस्था, संघटनांशी संपर्क सुरू केला आहे. महापालिकेने अगोदरच उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिका कर्मचार्‍यांच्या उपस्थितीची नोंद करणारी बायोमेट्रिक सेवाही थांबविण्यात आली आहे. महापालिकेत देखील एकाचवेळी जास्त कर्मचारी एकत्र येणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. यासाठी बैठका टाळून लेखी आदेश काढून त्यांना निर्णय कळविण्यात येत आहे.

शहरातील बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त मायकलवार यांनी मंगळवारी संबंधितांना सूचना दिल्या होत्या. व्यवसाय असल्याने तो बंद करता येणे शक्य नाही. मात्र तेथे गर्दी टाळता येईल, यासाठी संबंधितांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी विविध व्यापारी असोसिएशनसोबत चर्चा करण्यात येत असल्याचे मायकलवार यांनी सांगितले. एकाचवेळी दहा लोकांना बोलावले जात असल्यास तसे न करता त्यांना विभागून बोलविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच महापालिका आरोग्य विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा सामना, हेच सध्या प्राधान्य असल्याचे मायकलवार यांनी सांगितले.

दरम्यान, येथील जागरूक नागरिक मंचच्या पुढाकाराने हॉटेल्स मालक, मद्य विक्रेते यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. बुधवारी सायंकाळी मंचचे सुहास मुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आगामी तीन दिवसांसाठी हॉटेल्स, मद्यविक्री बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. हॉटेल्स चालक, मद्यविक्रेत्यांनीही यास सहमती दर्शविली.

मात्र याची अंमलबजावणी करताना सर्वांनीच करावी, अशी अट टाकण्यात आली. काहींनी बंद करायचे आणि काहींनी सुरू ठेवायचे, असे होणे योग्य नसल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. त्यास सर्वांनीच सहमती दर्शविली. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले आहे. त्यांनीच सर्वांना आवाहन केल्यास तीन दिवसांसाठी हॉटेल्स, मद्यविक्री बंद ठेवण्याची तयारी बैठकीत दर्शविण्यात आली.

व्हिजिलन्स स्कॉडची नियुक्ती
महापालिकेने गर्दी टाळण्यासाठी उद्याने, व्यायामशाळा, चित्रपट व नाट्यगृहे, कोचिंग क्लासेस, जलतरण तलाव, शॉपिंग मॉल्स, जॉगिंग ट्रॅक, मंगल कार्यालये बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी, यासाठी त्यावर निगराणी ठेवण्यासाठी महापालिकेने व्हिजिलन्स स्कॉड नियुक्त केले आहे. प्रभागनिहाय या नियुक्त्या केल्या असून, त्यावर आठ कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चार पर्यवेक्षकही नियुक्त केले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!