Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

होम क्वारंटाईनवर पोलिसांची करडी नजर

Share
गर्दी कमी करण्यासाठी शहर पोलिसांकडून कडक पाऊले, Latest News Police Reduce Crowd Action Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनासंगे युध्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’ची हाक दिली होती. त्याला नगरकरांनी उस्फूर्तपणे जोरदार प्रतिसाद देत अख्खा जिल्हा घरात बसून होता. त्यामुळे गजबजलेली बाजारपेठा, रस्त्यांवर सामसूम होती. दरम्यान, सायंकाळी 5 वाजता कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा देणार्‍या जिगरबाजांना नगरकरांनी घराच्या छतावर, गॅलरी, घरासमोर येत थाळ्या, टाळ्या वाजवून सलाम केला.

दरम्यान, त्यांच्या हातावर तसे शिक्के मारण्यात आले असून घरी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांचा वॉच ठेवण्यात आला आहे. घरी सोडलेल्या क्कारंटाईनची पोलीस दिवसातून दोन वेळा हजरी घेत आहे.

दिवसातून 256 जणांची दोनवेळा हजेरी

कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या प्रत्येकाची तपासणी जिल्हा रुग्णालयात केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 256 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले जात आहे. ज्यांचे अहवाल आले नाहीत, अशा व्यक्तींना रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्या हातावर तसे शिक्के मारण्यात आले असून घरी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांचा वॉच ठेवण्यात आला आहे. घरी सोडलेल्या क्कारंटाईनची पोलीस दिवसातून दोन वेळा हजरी घेत आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींची यादी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा पोलिसांना देण्यात येते. संबंधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या क्कारंटाईनची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याची आहे. या दृष्टीकोनातून संबंधित पोलिसांनी घरी असलेल्या क्कारंटाईनची हजेरी घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

एकूण निगेटिव्ह         196
देखरेखीखाली            247
अहवालाची प्रतीक्षा         2
आतापर्यंत तपासणी    200

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!