Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

‘ते’ महाविदयालय व शाळेच्या सुट्टीचे परिपत्रक खोटे

Share
'ते' महाविदयालय व शाळेच्या सुट्टीचे परिपत्रक खोटे, Latest News Hoilday Letter False Government Statement

मुंबई – कोरोना विषाणुला अटकाव करण्याच्या दृष्टीने महाविद्यालय, शाळांचे सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबत समाज माध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत.

यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहन शासनाने केले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!