Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

राळेगणसिध्दी नंतर आता हिवरे बाजारमध्ये पर्यटकांना बंदी

Share
राळेगणसिध्दी नंतर आता हिवरे बाजारमध्ये पर्यटकांना बंदी, Latest News Hivre Bajar Tourist Ban Ahmednagar

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- राळेगण सिद्धीपाठोपाठ आता हिवरेबाजार गावालाही भेट देणार्‍यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला असल्याने कोरोनाचा अटकाव झाल्यानंतर हिवरे बाजार पुन्हा खुले करण्यात येणार असल्याचे आदर्शगाव कार्य समितीचे राज्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन, अभ्यास दौर्‍यासाठीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. अशा ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी शासन आग्रह आहे. राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी येणार्‍यांची संख्या मोठी असते. त्यामुळे तेथे या भेटीसाठी येणार्‍यांना प्रतिबंध करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला होता. आता त्या पाठोपाठ हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनीही असाच निर्मय घेतला आहे. येथे सर्वांगीण ग्रामविकासाची संकल्पना अनुभवण्यासाठी जगभरातून विविध क्षेत्रातील पर्यटक, अभ्यासक येत असतात. कोरोना रोग संसर्गजन्य असल्यामुळे खबरदारी म्हणून हिवरे बाजारला भेट देण्याचे टाळावे, असा आग्रह ग्रामस्थांनी केल्यामुळे हिवरे बाजार भेटीस पर्यटकांसाठी प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बंदी काही काळासाठी असेल. याबाबतत कोणीही गैरसमज करून घेवू नये, असे आवाहन पोपटराव पवार यांनी केले आहे. तसेच कोरोनाला धैर्याने तोंड देऊन साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!