Friday, April 26, 2024
Homeनाशिककुटुंबातील सर्वांसाठी टॉकीजची थरारक, रोमँटिक, हॉरर चित्रपटांची मेजवानी

कुटुंबातील सर्वांसाठी टॉकीजची थरारक, रोमँटिक, हॉरर चित्रपटांची मेजवानी

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा परिणाम म्हणून, भारताच्या माननीय पंतप्रधानांकडून, २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. एक सामाजिक बांधिलकी आणि स्वरक्षण म्हणून, हा लॉकडाऊन आपण पाळायलाच हवा. असे असताना, मराठी मनोरंजन सृष्टीतील ‘झी टॉकीज’ने टॉकीज प्रीमियर लीगची घोषणा केली आहे.

जागतिक महामारीच्या या संकटात सुद्धा, ‘झी टॉकीज’वरील टॉकीज प्रीमियर लीग, मनोरंजनाची मेजवानी सादर करणार आहे. ही लीग ५ एप्रिल रोजी सुरु होणार असून, दर रविवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता एक नवीन दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्याची संधी यामुळे मिळणार आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी घरी थांबण्याची वेळ आलेली असली, तरीही घरबसल्या मनोरंजनासाठी ‘झी टॉकीज’वर ९ उत्कृष्ट मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

- Advertisement -

५ एप्रिल ते ३१ मे दरम्यान पार पडणार असलेल्या ‘टॉकीज प्रीमियर लीग’मध्ये विनोदी, थरारक, रोमँटिक, हॉरर इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम व नवीन चित्रपट पाहायला मिळणार आहेत. एक गूढरम्य रहस्य उलगडणाऱ्या तुंबाड या चित्रपटापासून ‘टॉकीज प्रीमियर लीग’ला सुरुवात होईल. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा, ‘झी टॉकीज’ वाहिनीवर प्रेक्षक आपल्या कुटुंबासोबत हे चित्रपट पाहून टॉकीज प्रीमियर लीगचा आनंद घेऊ शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या