Type to search

Breaking News मुख्य बातम्या हिट-चाट

बूट पॉलिश करणारा सनी हिंदुस्थानी ठरला इंडियन आयडॉल ११ चा विजेता

Share
बूट पॉलिश करणारा सनी हिंदुस्थानी ठरला इंडियन आयडॉल ११ चा विजेता Latest News Hitchat Sunny Hindusthani Make Winner of Indian Idol 11

मुंबई : सोनी टीव्ही वरील लोकप्रिय रियालिटी शो ‘इंडियन आयडल ११ या स्पर्धेचा विजेता कोण होणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. सोनी टीव्हीने विजेता घोषित केला असून सनी हिंदुस्तानी इंडियन आयडल ११ होण्याचा मान पटकवला आहे.

तर मराठमोळा रोहित राऊत फर्स्ट रनरअप ठरला आहे. सनी हिंदुस्तानी, रोहित राऊत, अनकोना मुखर्जी, अद्रिक घोष आणि रिधम कल्याण हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले होते. विजेता सनी हिंदुस्तानी याला टी-सिरीजच्या आगामी सिनेमात गाण्याची संधी मिळेल.

दरम्यान ऑक्टोबर २०१९ मध्ये सुरु झालेल्या ‘इंडियन आयडलने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या शोचा अंतिम सोहळा दिमाखात पार पडला. या अंतिम सोहळ्यात नेहा कक्कड, आदित्य नारायण, आयुष्मान खुराना आणि इतर स्पर्धकही सहभागी झाले होते. अंतिम सोहळा धमाकेदार परफॉर्मन्सने नटलेला होता. त्याचबरोबर कृष्णा अभिषेक आणि भारती सिंह या विनोदवीरांनी कार्यक्रमाला रंगत आणली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!