Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

त्या हायप्रोफाईल पार्टीने भरली धडकी

Share
त्या हायप्रोफाईल पार्टीने भरली धडकी, Latest News Highprofile Party Problems Ahmednagar

अधिकार्‍याने दडविली माहिती । प्रशासन अंधारात

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यासह नगरकरांना ‘कोरोना’च्या भीतीखाली असतानाच नगरमधील एका हायप्रोफाईल रंगारंग पार्टीच्या चर्चेने धडकी भरली आहे. या पार्टीचे ‘ऑपरेशन’ करण्याऐवजी ती दडवून ठेवत जबाबदार अधिकार्‍याने प्रशासकीय यंत्रणेलाही अंधारात ठेवले आहे. आता या पार्टीची धास्ती नगरकरांना भरलीय. कलेक्टरांना त्याची कुणकुण लागली असून त्याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

1 मार्चला दुबईहून परतलेल्या फ्लाईटमधील भारतीय प्रवाशांनी कोरोनाचा वानोळा देशात आणला. तो थेट नगरातही पोहचला. 4 मार्चला नगरमधील प्रतिथयश व्यक्तीच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या प्रित्यर्थ जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मोजक्या हायप्रोफाईल ‘तज्ज्ञां’ना या पार्टीत इनव्हाईट करण्यात आले होते. शंभरपेक्षा जास्त प्रतिष्ठीत या पार्टीत सहभागी झाले. ही पार्टी अटोपल्यानंतर आठवडाभराने नगरमध्ये कोरोनाचा संशयित आढळून आला.

त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच पार्टी आयोजक अन् त्यात दंग असलेल्यांची झोप उडाली. या पार्टीत सहभागी असलेला ‘तो’ जिल्हा प्रशासनाने निगरानीखाली ठेवला आहे. ती पार्टी होऊन 11 दिवसांचा कालावधी उलटला आहे. कोरोना संसर्गाची 14 दिवसांपर्यंत भिती असते. पार्टीतील ‘महाशय’ कमालीचे टेन्शनखाली असून ते तीन दिवस उलटण्याची वाट पाहत आहेत.

ही पार्टी अन् तो संशयित याचे कनेक्शन मुद्दामहून जिल्हा प्रशासनापासून लपविण्यात आले असल्याची चर्चा नगरात सुरू आहे. यासंदर्भात कलेक्टरांशी संपर्क केला असता तेही अनभिज्ञ असल्याचे समजले. मात्र त्यांनी याची नोंद करत चौकशीचे आश्‍वासन ‘नगर टाइम्स’ला दिले.

काळजी नसावी पण…
पार्टीतील इतरांना खोकला, ताप, सर्दीचा कोणताही त्रास नसल्याचे समजते. शिवाय दहा दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. पण यातील एखादा जरी संशयित आढळला तर काय, अशी भिती ‘तज्ज्ञ’ वर्तवित आहे. हजारो नगरकर या हायप्रोफाईलच्या संपर्कात आल्याचे समजते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!