Wednesday, April 24, 2024
Homeनगरखाकीतील माणुसकी… पगारातून दिला गरजूंना किराणा

खाकीतील माणुसकी… पगारातून दिला गरजूंना किराणा

अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे अनेक हातांचे काम गेले अन् त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यांना अनेक दानशूरांची मदत होत आहे. गुन्हेगारांवर जरब बसविणारी खाकीही त्यात मागे नाही. नगरच्या पोलीस हेडक्वार्टरमधील हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कणगरे यांनी आपल्या पगारातील पैशातून 11 गरजू कुटुंबाला किराणा माल भरून दिला. खाकीतील त्यांच्या या माणुसकीला नगरकरांनी सॅल्यूट ठोकला आहे.

खाकी वर्दीतील माणुसकी आज महावीर जयंती दिसून आली. आज नगर येथील पोलीस मुख्यालातील वसाहतीतील बाळासाहेब कणगरे त्यांची पत्नी प्रणिती कनगरे जावई अजित वाल्हेकर, मुलगी प्रीती वाल्हेकर, सुरेखा कनगरे यांच्या कुटुंबियाच्या वतनी पोलीस वसाहतीजवळ राहणार्‍या गरजूकुटुंबांना 10 किलो गहू, 3 किलो तांदूळ, 2 किलो साखर 1 तेल पिशवी, चहा पावडर, तूरदाळ, हरबरा डाळ, मुगडाळ, मठडाळ, शेंगदाणे प्रत्येकी 1 किलो, मसाला पाकीट, मीठ अशी किराणा साहित्य देण्यात आले. खाकी वर्दीतली या माणुसकीबद्दल बोलताना हेड कॉन्स्टेबल कनगरे म्हणाले की, माझे समाजाचे आपणही देने लागतो या भावनेतून माझ्या कुटुंबियाच्या वतनी छोटीशी मदत करून समाधान मिळायचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या