Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

हंगा नदीवरील वाघुंडे,बाबुर्डी रुईछत्रपतीमध्ये बेसुमार वाळू उपसा

Share
हंगा नदीवरील वाघुंडे,बाबुर्डी रुईछत्रपतीमध्ये बेसुमार वाळू उपसा, Latest News Hanga River Sand Problem Supa

सुपा (वार्ताहर)- पारनेर तालुक्यातील वाघुंडे परीसरातून हंगा नदी वाहते. वाघुंडे शिवारात हंगा नदीचे पात्रही मोठे विस्तृत आहे. मात्र सध्या या नदी पात्रातून वाघुंडे,बाबुर्डी, रूईछत्रपती परीसरात बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. याकडे पारनेरच्या महसूल विभागासह सुपा पोलिसांचेही अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने ही वाहतूक दिवस मावळल्यानंतर जोरात सुरू आहे. या मुळे नदी पात्रासह पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.

याठिकाणी नदीपात्रातील वाळू उपसा करताना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यास वाळू वाहतूकदार विरोध करणारांना थेट जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तसेच ही वाळू वाहतूक रात्री 11 वाजेनंतरच  सुरू होते त्यामुळे स्थानिक नागरिकांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.रूईछत्रपती याठिकाणी कडूस-वाळवणे रस्त्यालगत असलेल्या हंगा नदीवरील पुलाजवळच दिवसा ढवळ्या वाळू उपसा करून चाळण्यात येते.

नदीपात्रातील वाळू अंधार पडला की ती चाळून मोठ-मोठे ढीग तयार ठेवले जातात व रात्री अंधार पडल्यानंतर ही वाहतूक सुरू होते. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्र होताच वाळू वाहतूक जोमात सुरू होते. ही वाळू नगर पुणे महामार्ग तसेच सुपा पोलीस ठाण्याच्या समोरून बिनदिक्कत सुरू आहे. याकडे महसूलसह पोलीस खात्याचेही दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये या खात्यांच्या विरोधात तिव्र संताप निर्माण झाला आहे.

याबाबत सुपा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर लगेच पोलीस कर्मचार्‍यांमार्फत संबंधित वाळू चोरांना संपर्क केला जातो पोलीस येणार असल्याची माहिती मिळताच काही क्षणात सर्व वाहने तेथून गायब केले जातात यावरून पोलीस प्रशासन व वाळूतस्कर यांचे लागेबांधे आहेत अशी चर्चा ग्रामस्थांमधून केली जात आहे.या वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

दुष्काळी तालुका म्हणून पारनेरची राज्यात ओळख आहे.अशा परीस्थितीत ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व शासकीय निधीतून हंगा नदीवर केटीवेअर व बंधारे बांधण्यात आले.अल्प प्रमाणात पाऊस झाला तरी पिण्याच्या पाण्याची सोय होते.मात्र काही दिवसांपासून वाळू तस्करांनी हे बंधारे व केटीवेअर उकरण्यास सुरूवात केल्याने नदी पात्र धोक्यात आले आहे.
-वैभव नांदखिले, ग्रामस्थ वाघुंडे,ता.पारनेर

आम्ही पोलीस व महसूलविभागाकडे अनेकवेळा तक्रार केली मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसते. आम्ही विरोध करून उपयोग होत नाही.तसेच गावातील विरोध करणार्‍या लोकांना वाळू वाहतूकदार दम देतात इतकेच नाही तर जीवे मारण्याच्या धमक्याही देतात. या बाबत लवकरच आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहोत.
-संदीप मगर,सरपंच वाघुंडे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!