प्रथमच हुकली मुर्हूताची खरेदी

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) – हिंदू नववर्षाची सुरुवात अन् साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडवा नगरच्या सराफ आणि वाहनविक्रेत्या व्यावसायिकांना यंदा पहिल्यादांच कोरडाठाक गेला. ‘कोरोना’मुळे या दोन्ही व्यावसायिकांचे शटरलॉक असल्याने खरेदीचा नगरकरांचा मुर्हूता यंदा प्रथमच हुकला.

गुढी उभारण्यासाठी घरोघरी दरवर्षी जय्यत तयारी असते. त्यातच पूजेसाठी लागणारे फुले, साखरेच्या माळा, दारावर तोरण, गोडधोड पदार्थ, बांबूची काठी असे साहित्य खरेदी करण्यासाठी नगर शहरातील कापडबाजार, चितळे रोड, माळीवाडा, सदरबाजर, भिंगार, केडगाव, सावेडी, प्रॉफेसर कॉलनी, भिस्तबाग परिसरात असणार्‍या मार्केट मधून नगरकर दरवर्षी खरेदी करत असतात.

मात्र यंदा कोरोना संसर्गजन्य आजराचा सामना करत आहे. त्यातच देश लॉकडाऊन असून नगर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नगरकरांनी गुढीपाडव्यासाठी लागणार्‍या वस्तूची खरेदी न करता घरात उपलब्ध असणार्‍या साहित्याच्या माध्यमातून गुढीपाडवा साजरा केला.

गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. यंदा पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे साध्या स्वरूपात पारंपरिक पद्धतीने यंदा सण साजरा करण्यात आला.

मंदीची भिती
2016 मध्ये आलेल्या नोटबंदीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी मंदी आली होती. गेल्या वर्षभरापासून या मंदीतून हे क्षेत्र बाहेर आले; मात्र कोरोनामुळे जगभरात अर्थव्यवस्था पुन्हा कोलमडली आहे. याचा परिणाम भारतात विविध क्षेत्रावर झाला आहे. यामुळे रिअल इस्टेटमध्ये पुन्हा मंदी येण्याची भिती व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *