Monday, April 29, 2024
Homeनगरसंकटकाळात ‘राष्ट्रवादी’ जनतेच्या पाठीशी

संकटकाळात ‘राष्ट्रवादी’ जनतेच्या पाठीशी

पालकमंत्री हसन मुश्रीफ : वर्धापनदिन रक्तदान शिबिराने साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी) –  पुरोगामी विचार व विकासाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे स्थान निर्माण केले. संकट काळात जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच उभा राहिला आहे. करोनाच्या संकटकाळात कोकणात आलेल्या चक्रीवादळाने अनेक नागरिक उघड्यावर आले. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी पवार स्वत: त्यांच्या भेटीला गेले. जाणता राजाचे उत्तम उदाहरण त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात असल्याची भावना पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर-पुणे रोड येथील पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जि. प. सदस्या प्रभावती ढाकणे, निरीक्षक वर्षाताई शिवले, नरेंद्र घुले पाटील, प्रताप ढाकणे, मंजुषा गुंड, निर्मला मालपाणी, शारदा लगड, अंबादास गारुडकर, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक संजय चोपडा, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, अमोल गाडे, किसनराव लोटके, सोमनाथ धूत, उबेद शेख, सीताराम काकडे, कपिल पवार, संजय कोळगे, सुरेश बनसोडे, अभिजीत खोसे, रत्नाकर ठाणगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाला 21 वर्षे होत असताना सर्वसामान्यांसाठी प्रभावीपणे पक्ष कार्यरत आहे. जगभर करोनाचे संकट असताना राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाने करोना संकटावर नियंत्रण मिळवण्यास यश येत आहे. राजकीय कार्यक्रम न घेता रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमाने पक्षाचा स्थापना दिन साजरा करीत आहोत.

सकाळी 10.10 मिनिटांनी जिल्हाध्यक्ष फाळके आणि घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. करोना संकटकाळात विशेष योगदान देणार्‍या महिला डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शासकीय अधिकारी यांना ‘मर्दानी महाराष्ट्राची’ या सन्मानाने पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या