Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीगोंदा : यापेक्षा कमी धान्य दिल्यास कारवाई – तहसिलदार

श्रीगोंदा : यापेक्षा कमी धान्य दिल्यास कारवाई – तहसिलदार

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – शासनामार्फत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सध्याच्या ई-पॉस मशिनवर कार्यरत असलेल्या अंत्योदय कुटूंब लाभार्थी यांना प्रतिकार्ड 26 किलो गहू व 9 किलो तांदूळ असे एकूण 35 किलो धान्य देणेत येणार आहे. तसेच प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ देणेत येणार आहे.

सदर दोन्ही योजनेसाठी पात्र लाभार्थी यांना गहू 2 रुपये किलो व तांदूळ 3 रुपये किलो असा दर राहील. तसेच अंत्योदय कार्ड धारकांना 1 किलो साखर रु 20 प्रमाणे, तर 1 किलो डाळ रु 45 प्रमाणे देय राहील .याप्रमाणेच रास्त भाव दुकानदार यांनी वाटप करावे यापेक्षा कमी धान्य दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

- Advertisement -

तसेच सबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रास्तभाव दूकानामध्ये गर्दी न करता प्रत्येक ग्राहकाच्या मध्ये 1 मीटर अंतर ठेवून तोंडाला मास्क लावावे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन धान्याची उचल करावी. असे तहसीलदार श्रीगोंदा यांचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या