Type to search

Featured नाशिक

त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले; गटविकास अधिकाऱ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

Share
 आ. हिरामण खोसकराचा सत्कार
त्र्यंबकेश्वर:
सतरा वर्षापुर्वी स्थापन झालेल्या त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे नशीब उजळले आहे चक्क दोन योजना मध्ये पंचायत समिती गौरवास्पद ठरली आहे. त्यातच नवनिर्वाचित आ. हिरामण खोसकर यांनी येथे भेट दिली परिणामी आज या कार्यालयात उत्साहाचे वातावरण होते.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यात राज्यात व्दितीय क्रमांक व प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रथम टप्पा 98, 7 टक्के घरकुल पूर्ण केले यात चौथा क्रमांक असे यश त्र्यंबकेश्वर तालुक्याने मिळवले या उत्कृष्ट काम कामगिरी बद्दल राज्यपाल भगत सिंह कोशायरी यांचे हस्ते शुभ हस्ते व मुख्य सचिव अजोय मेहता यांचे उपस्थितीत मधुकर मुरकुटे गट विकास अधिकारी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती यांना दि. 20 रोजी  मुंबई येथे गौरविण्यात आले. त्याचे वर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
दरम्यान आज आ. हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली त्यांचा ही सत्कार पंचायत समिती सदस्य यांचे कडून करण्यात आला
सभापती ज्योती राऊत यांचे हस्ते हा सत्कार करणेत आला. या वेळी उप सभापती अलका झोले सदस्य रविंद भोये, देवराम मौळे, मोतीराम दिवे, मनबाई भस्मा तसेच विनायक माळेकर इ. उपस्थित होते. सदस्यांनी तालुक्याच्या समस्या आ. खोसकरांकडे  मांडल्या विकासासाठी सहकार्याचे आश्वासन खोसकरांनी दिले एकंदरीत आज पंचायत समितीत आनंदाचा दिवस होता. लिपिक सुनील मोगरे सहअन्य कर्मचारी उपस्थित होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!