Type to search

Featured maharashtra

राज्यपालांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

Share

पंढरपूर:

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. विधिवत पुजेनंतर राज्यपाल कोश्यारी यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्यावतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, शिवाजी मोरे, संभाजी शिंदे यांच्यासह मंदिर समितीचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!