Type to search

पुणतांबाच्या महिलेचे नगरमधून धूम स्टाईलने साडेतीन तोळे लांबविले

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरामध्ये सोनसाकळी चोरीचे प्रकार सुरूच असून शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे सोने धूम स्टाईलने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नातेवाईकांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रमासाठी रेणूका महेश हारेर (रा. पुणतांबा ता. राहता) या नगरमध्ये आल्या होत्या. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास सावेडी गावाच्या कमानी जवळून रेणूका पायी चालल्या होत्या.

यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांने रेणूका यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण व एक तोळ्याचे मिनी गंठण असे साडेतीन तोळे सोने ओेरबडून नेले.

रेणूका हारेर यांना आरडाओरडा करण्याच्या आत भामट्याने पोबारा केला. रेणूका हारेर यांनी तत्काल तोफखाना पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!