जागतिक व्याघ्र संवर्धन दिन : व्याघ्र संवर्धन काळाची गरज

0

आज जागतिक व्याघ्र दिन त्या निमित्ताने…. जंगातील वाघ या वैविध्यपूर्ण प्राण्याची संवर्धन करण्यासाठी रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये २०१० साली झालेल्या वाघांविषयीच्या शिखर परिषदेत या दिवसाची घोषणा गेली गेली. वाघांना संरक्षण पुरवण्यासाठी संबंधित देशांसहित इतरांनाही साहाय्य केले आहे. त्यानंतर २९ जुलै जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

भारतीय वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. त्यासाठी विशेष व्याघ्र संवर्धन अभियान राबविले जाते. परंतु वाढती लोकसंख्या,अनिर्बंध शिकार आणि अधिवासावरील अतिक्रमणांमुळे त्यांची संख्या अत्यंत कमी झालेली आहे. गेल्या शतकात वाघांची शिकार केलीच शिवाय जागतिकीकरणाच्या हव्यासापायी मानवाने केलेली जंगलतोड आणि अतिक्रमण करून वाघांच्या अधिवासाचे क्षेत्रही कमी केले; परिणामी, जंगलातील प्राणी अन्नासाठी जवळच्या वाड्या- वस्त्यांवर हल्ले करू लागले.

त्यामुळे वाघांनीही आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला. आज मोठ्या प्रमाणावर शेळ्या ,मेंढ्या फस्त करताना वाघ आपल्या दृष्टीस पडतो. कालांतराने माणूस- वाघ संबंध बिघडत गेले. त्यामुळे वाघांची शिकार होण्यास सुरवातही झाली. सध्या नामशेष होण्याच्या जवळपास पोहचलेला वाघ जतन करण्याची आवश्यकता यामुळेच निर्माण झाली आहे. वाघाची शिकार ही माणसाची मर्दुमकी या गैरसमजामुळे सुमारे ९७ टक्के वाघांची शिकार झाली आणि आज जेमतेम २२२६ वाघ भारतात शिल्लक राहीले आहेत.

वाढती शेती, अतिक्रमण आणि जंगलतोडीमुळे वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र सर्वच देशांत कमी होत गेले. बदलत्या हवामानाचा फटका वाघांनाही बसत आहे. उदा. भारत आणि बांगलादेशाच्या किना-यावरच्या सुंदरबन पाणथळीत खूप वाघ आहेत. परंतु, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे येत्या ३० वर्षातच त्यांना अक्षरश: बेघर व्हावे लागणार आहे. अद्याप वाघांची चोरटी शिकार आणि तस्करी होतच आहे. सामान्य माणूस आणि वाघ यांच्यामधील दरी कमी होणे आवश्यक आहे.

आज वाघांच्या नष्ट झालेल्या प्रजातींपैकी बाली वाघ, जावन वाघ, कॅस्पियन वाघ यांचा समावेश होतो तर, इंडोचायनीज वाघ किंवा कोबर्टी, सुमात्रन वाघ, सायबेरियन वाघ, दक्षिण चिनी वाघ या वाघाच्या उपप्रजाती म्हणून ओळखल्या जातात.
विविध वन्यजीव संस्थांनी एकत्र येऊन रशियामध्ये २०१० साली बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘ग्लोबल टायगर फोरम’ ची स्थापना करण्यात आली. या फोरम मधील प्रत्येक देशाने पुढील बारा वर्षात अर्थात २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट झाली पाहिजे. असे ध्येय ठरवण्यात आले.

आज हा अहवाल बघितला तर भारतात गेल्या सहा वर्षात वाघांची संख्या ६९० ने वाढली आहे. त्यामुळे काही प्रमाणात व्याघ्र संवर्धन भारतात विविध माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वाघमामांना सरंक्षण मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*