Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ग्लोबलनगरी अमेरिका व जिल्हा परिषदेकडून शाळा व शिक्षकांसाठी पुरस्कार

Share
शिक्षक संघटनांचे अधिवेशन केवळ दीर्घ सुट्टीत, Latest News Teacher Convention Associations Holidays Sangmner

संगमनेर (वार्ताहर) – ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिका व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्यावतीने शाळा व शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

मागील तीन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक यांच्या सहकार्याने व्हिडीओ कॉन्फरन्स यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 115 शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, पदाधिकारी व पालकांशी या माध्यमातून संवाद साधण्यात आला आहे. या अनुषंगाने ज्या शाळांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय आणि अनुकरणीय असे शैक्षणिक विकासासाठी कार्य केले आहे. त्यांच्यासाठी ग्लोबल नगरी पुरस्कार देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमधून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झालेल्या शाळा या प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय माहितीचे आदान-प्रदान प्रक्रियेत सक्रीय सहभागी झालेल्या शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर ग्लोबल नगरी जिल्हा परिषद अहमदनगर शाळा पुरस्कारासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात सामाजिक उपक्रम, तंत्रस्नेही उपक्रम, पर्यावरण उपक्रम यांची दखल घेण्यात येणार असून प्रत्येक क्षेत्रातील तीन शाळा यात निवडल्या जाणार असून एकूण नऊ शाळांना हा पुरस्कार प्रदान केल्या जाणार आहे. यासाठी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहेत. ग्लोबल नगरी जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असून हे पुरस्कार ही सामाजिक, तंत्रस्नेही व पर्यावरण अशा तीन क्षेत्रात काम करणार्‍या नऊ शिक्षकांना गौरवण्यात येणार आहेत. त्याचे स्वरूपही सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे असून प्रथम क्रमांक आला 5000, व्दितीय तीन हजार, तृतीय 2000 अशी रक्कम देण्यात येणार आहेत.

ग्लोबल नगर जिल्हा परिषद अहमदनगर विद्यार्थी पुरस्कारासाठी 9 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यासाठीचे क्षेत्र सामाजिक, तंत्रस्नेही व पर्यावरण असे ठेवण्यात आले आहेत. या पुरस्कारातही सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र रोख रक्कम देण्यात येणार असून प्रथम क्रमांक तीन हजार, द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये, तृतीय क्रमांक एक हजार. ग्लोबल नगरी जिल्हा परिषद अहमदनगर विद्यार्थी प्रोत्साहन पुरस्कारासाठी समाजासाठी उल्लेखनीय आणि प्रेरणात्मक कार्यातून प्रेरणा घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

शौर्य, विशेष प्राविण्य, कला, संगीत, विशेष छंद यात काम केलेल्या निवडक विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रुपये 1000 देऊन गौरवण्यात येणार आहे. यात शाळा साठीच्या पुरस्कारासाठी मुख्याध्यापकांनी नामनिर्देशन करावयाचे आहे. शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकाने स्वतः नामनिर्देशन करायचे आहे. विद्यार्थी पुरस्कारासाठी शिक्षकांनी क्षेत्रानुसार विद्यार्थ्यांचे नामनिर्देशन करणे आवश्यक असणार आहे. जे क्षेत्रासाठी अर्ज सादर केले जाणार आहेत. त्या क्षेत्रातील अतिरिक्त माहिती पीपीटी, पीडीएफ, व्हिडिओज लिंक वरती अपलोड करावयाचे आहेत. अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे मूल्यमापन सादर केलेल्या माहितीच्या पडताळणीनंतर पाच शिक्षण तज्ज्ञ व्यक्तींच्या पथकाकडून करण्यात येणार आहेत.

अशी होणार प्रक्रिया
10 मार्च रोजी पुरस्काराच्या संबंधिची माहिती जाहीर करण्यात आली असून, 10 मार्चला जिल्ह्यातील शाळा व शिक्षकांसाठी नामनिर्देशन फॉर्म लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहे. 17 मार्चपर्यंत नामनिर्देशन फॉर्म भरणे. करता येणार असून, 10 एप्रिलपर्यंत पुरस्काराचे मूल्यमापन प्रक्रिया करण्यात येईल. 20 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहेत.

असे असतील पुरस्कार
ग्लोबल नागरी फाउंडेशन अमेरिका व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय माहितीचे आदान-प्रदान करणार्‍या व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद झालेल्या शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्लोबल नगर जिल्हा परिषद शाळा पुरस्कारासाठी नऊ शाळा. ग्लोबल नगर जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षक पुरस्कारासाठी नऊ शिक्षक. ग्लोबल नगरी जिल्हा परिषद अहमदनगर विद्यार्थी पुरस्कारासाठी नऊ विद्यार्थी व प्रोत्साहनात्मक पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहेत. शिक्षक विद्यार्थी व शाळांना असा एकत्रित स्वरूपात पुरस्कार दिले जाणार आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!