Sunday, April 28, 2024
Homeनगरडिजिटल प्रिस्कीप्शनव्दारे औषध विक्रीला परवानगी

डिजिटल प्रिस्कीप्शनव्दारे औषध विक्रीला परवानगी

मंत्री शिंगणे : राज्यात 288 कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीला परवानगी

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना पार्श्वभूमीवर दोन महिने पुरेल एवढा औषधांचा साठा राज्यात उपलब्ध आहे. औषधांचा कोणताही तुटवडा नाही. खासगी डॉक्टरांनी आपली वैद्यकीय सेवा सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी ती सुरू नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील डॉक्टरांनी दिलेल्या डिजिटल प्रिस्कीप्शननुसार औषध विक्री करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

- Advertisement -

शनिवारी नगर येथे आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वाूमीवर सरकार सर्व उपाययोजना करत आहे. कोणत्याही प्रकारे औषधांचा तुटवडा पडू दिला जाणार नाही, याची खबरदारी सरकारने घेतली आहे. कोरोना संसर्गावर अद्यापपर्यंत कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही किंवा कोणत्या गोळ्याही त्याच्यावर आलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी यासंदर्भात रिसर्च सुरू आहे. मात्र, पुढील दोन महिने कोरोनावर विशिष्ट औषध उपलब्ध होईल, असे मला वाटत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

खाजगी रुग्णालय सुरू ठेवा असे निर्देश दिलेले आहेत. असे असताना अनेक ठिकाणी दवाखाने बंद दिसत आहेत. काही डॉक्टर पेशंट तपासत आहेत. मेडिकल दुकानदारांना कागद असल्याशिवाय औषधे देऊ नका, असे सांगितले आहे. पण दुसरीकडे डिजिटल प्रिस्कीप्शनची सोय उपलब्ध करून दिली आहे. डिजिटल पद्धतीने औषधे लिहून दिल्यावर ते दिले जातील, असेही ते म्हणाले. ज्या साखर कारखाने, खासगी कारखान्यांनी सॅनिटायझर तयार करण्याची परवानगी मागितली होती. अशा 288 कारखान्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. यामुळे राज्यात सॅनिटाझरचा तुटवडा नाही, असा दावा मंत्री शिंगणे यांनी केला.

उत्पादन घटल्याने काही वस्तूंचा तुटवडा
ब्रिटानीया, नेस्टले, पतंजली आणि अन्य मसाले उत्पादक कारखाने हे राज्याबाहेर आहेत. त्याठिकाणी लॉकडाऊनमुळे अवघे 30 टक्केच कामगार कामावर आहेत. यामुळे उत्पादन घटले आहे. तसेच हे सर्व कारखाने राज्याबाहेर असून त्यांचे उत्पादन राज्यात आणताना पोलीस यासह अन्य तपासणी होत असल्याने ग्राहकांपर्यंत पोहचण्यास वेळ लागत असल्याने काही वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, त्यावर लवकरच मार्ग निघेल असे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या