Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा – दुचाकीवर गांजा वाहतूक करणाऱ्याला अटक

श्रीगोंदा – दुचाकीवर गांजा वाहतूक करणाऱ्याला अटक

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील नगर सोलापूर महामार्गावर तालुक्याच्या हद्दीतील घोगरगाव सूत गिरणी जवळ दीड किलो गांजा घेऊन जात असलेला खरवंडी ता.नेवासा येथील आरोपी बाबासाहेब शिंदे वय ४२ याला पोलिसांनी अटक केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप हे तपास करत असून पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश ददांडे यांच्या फिर्यादीवरून अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या