Thursday, April 25, 2024
Homeनगरगांजासाठी काहीपण….! शक्कल लढविणारे 2 अटकेत

गांजासाठी काहीपण….! शक्कल लढविणारे 2 अटकेत

पुणे (प्रतिनिधी) – कोरोनाव्हायरच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र गांजा साठी दोन तरुणांनी अनोखी शक्कल लढवली. मनपा कर्मचाऱ्याचा ड्रेस परिधान करून त्यांनी चक्क गांजा आणला. मनपा कर्मचारी आणि सफाई कर्मचार्‍याचा ड्रेस घालून दोघांनी गांजा आणला. मात्र सिंहगड चेक पोस्टवर दोन्ही गंजाड्यांचा भांडाफोड झालाय. याप्रकरणी ऋषी रवींद्र मोरे आणि सागर चंद्रकांत सुर्वेला अटक करण्यात. दोघांकडून एकवीसशे रुपयाचा गांजा जप्त केला. दोघेही 20 ते 21 वर्षीय वयोगटाचे असून पर्वती परिसरातील रहिवासी आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचे ड्रेस घालून ते गांजा वितरण करत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे चौकशीत मोठ्या या रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.

दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम 188 अंतर्गत, अमली पदार्थ कायद्याअंतर्गत आणि संचार बंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही कारवाई करण्यात आली. कोल्हेवाडी खडकवासला परिसरात अटक केली. एक तरूण पेंटर आणि दुसरा बिगारी आहे. अटकेनंतर पोलिसांनी गांजा आणलेल्या ठिकाणी धाड टाकली मात्र तिथे कोणीच नव्हतं. त्यामुळे एक तर हे गांजा वितरण करायला आले असतील किंवा गांजा घेण्यासाठी या बाबतचा पुढील तपास सुरू असल्याचं पोलिस निरीक्षकांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या