Thursday, April 25, 2024
Homeनगरगडाखांना सुरूची, तनपुरेंना निलांबरी

गडाखांना सुरूची, तनपुरेंना निलांबरी

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सरकारी बंगल्याचे वाटप

मुंबई- ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाले नसली तरी त्यांना बंगले मात्र मिळाले आहेत. सगळ्याच 36 मंत्र्यांना बंगले मिळाले असून नगरचे मंत्री शंकरराव गडाख यांना सुरूची 16 तर प्राजक्त तनुपरे यांना निलांबरी 402 बंगला मिळाला आहे. नगरचे या दोेन्ही मंत्र्यांना खाते कोणते हे गुलदस्त्यात असले तरी कोणत्या बंगल्यात राहतील हे मात्र फिक्स झाले आहेत.

- Advertisement -

खातेवाटपाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून आज रात्रीपर्यंत खातेवाटप होईल अशी माहिती शरद पवार यांनीच नगर दौर्‍यात दिली आहे. नगरमधून शंकरराव गडाख यांना कॅबिनेट तर प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री पद मिळाले आहे. त्यांना कोणती खाती मिळणार हे अद्याप निश्चित नसले तरी ते कोणत्या बंगल्यात राहणार हे मात्र ठरले आहे. मंत्री गडाखांचा मुक्काम सुरूची 16 मध्ये तर मंत्री तनपुरे यांचा मुक्काम निलांबरी 402 मध्ये राहणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला देवगिरी बंगला आला आहे. अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगीरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे-सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन हे बंगले मिळाले आहेत.

छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत.मातोश्रीवर राहणारे मंत्री आदित्य ठाकरे यांना अ-6 निवासस्थान हे निवासस्थान मिळाले आहे. बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर 1202, विश्वजीत कदम यांना निलांबरी 302, सतेज पाटील यांना सुरुची-3, आदिती तटकरे यांना सुनिती -10 हे निवासस्थान देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या