Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

जि. प. रिक्त जागांसाठी; 12 डिसेंबरला मतदान

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या चार रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 12 डिसेंबरला मतदान होणार असून दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार आहे. गोवर्धन, मानूर व खेडगाव या तीन गटांंसाठी पोटनिवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या 15 व पंचायत समितीच्या 13 रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सोमवारी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यात जिल्ह्यातील गोवर्धन (नाशिक), मानूर (कळवण) व खेडगाव (दिंडोरी) या तीन गटांंचा समावेश आहे. तर नांंदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी व निफाड तालुक्यातील नांदुर्डी गणासाठीही याच दिवशी मतदान होणार आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या भारती पवार व शिवसेनेचे धनराज महाले यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.

भारती पवार कळवण तालुक्यातील मानूर तर धनराज महाले खेडगाव गटातून सदस्य होते. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी गोवर्धन गटाचे राष्ट्रवादीचे सदस्य हिरामण खोसकर यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. 12 डिसेंबरला या जागांसाठी मतदान होणार आहे. मागील सोमवारी या चार जागांसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

अध्यक्षपदासाठी आज आरक्षण सोडत

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उद्या मंगळवारी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. अध्यक्षपद कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होते याकडे सदस्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, तीन जागांसाठी पोटनिवडणुकीनंतर जि. प. पदाधिकारी निवड होणार की तत्पूर्वी होणार याबाबत उत्सुकता आहे. कारण रिक्त चार जागांचा पदाधिकारी निवडीवर राजकीय परिणाम होणार आहे.

असा आहे कार्यक्रम

तारीख                         कार्यक्रम
22 नोव्हेंबर              अधिसूचना प्रसिद्ध
22 ते 27 नोव्हेंबर      उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत
28 नोव्हेंबर              अर्ज छाननी
4 डिसेंबर                 (जेथे अपील नाही) अर्ज माघारी घेण्याची मुदत
7 डिसेंबर                 (जेथे अपील आहे) अर्ज माघारी घेण्याची मुदत
12 डिसेंबर               मतदान
13 डिसेंबर               मतमोजणी

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!