Friday, April 26, 2024
Homeनगरअन्न व औषध प्रशासनातील सहाय्यक आयुक्त अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अन्न व औषध प्रशासनातील सहाय्यक आयुक्त अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

दाभाडे शेवगावचा, घराची झाडाझडती

बीड – आटा मीलच्या त्रुटी आणि लायसेन्स रिन्यूव्हल करण्यासाठी 35 हजार रुपयांची दलालामार्फत लाच स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन विभागाचे वर्ग -1 चे अधिकारी कृष्णा नामदेव दाभाडे यास काल सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी त्याच्या कार्यालयातून उचलले. फिर्यादीकडून दाभाडे याच्या हस्तकाने झेरॉक्स सेंटरमध्ये 35 हजार रुपयांची लाच घेतली होती.

- Advertisement -

बीड शहरातील एका आटा मीलवर दाभाडे याने गेल्या काही दिवसांपूर्वी छापा मारला होता. त्यामध्ये त्रुटी दाखवत आटा मिल चालकाला दाभाडे याच्याकडून लाचेची मागणी होत होती. 13 मार्च रोजी दाभाडे याने आटा मिल चालकास त्रुटी दूर करण्यासाठी 25 हजार आणि लासेन्स नूतनीकरणासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. आटा मिल चालकाने याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक अधिकार्‍यांकडे धाव घेऊन तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी काल सकाळी अन्न व औषध प्रशासन कार्यालय परिसरामध्ये सापळा रचला.

दाभाडे याचा दलाल कार्यालयाच्या बाहेर झेरॉक्स सेंटर टाकून बसलेला आहे, ज्ञानेश्वर ऊर्फ राजेश्वर नवनाथ शेळके असे त्या दलालाचे नाव असून आज सकाळी आटा मिल चालकाने शेळके याच्याकडे 35 हजाराची लाच दिली. ती स्वीकारताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने शेळकेच्या मुसक्या बांधल्या. तक्रार कृष्णा दाभाडे यांच्याविरोधात असल्याने एसीबीने लागलीच कार्यालयात जावून दाभाडे याच्याही मुसक्या आवळत त्याला कार्यालयाबाहेर दोनशे ते तीनशे फुट चालत आणले.

दाभाडे याची मालमत्ता मोठ्या प्रमाणावर असून नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या दहेगावने येथील त्याच्या निवासस्थानीही एसीबीने कारवाई केल्याचे सांगण्यात येते. दाभाडे याची मालमत्ता आणखी कुठे कुठे आहे याचा तपास एसीबीकडून करण्यात येत असून आजच्या कारवाईत दाभाडेसह दलाल शेळके जेरबंद केला गेला आहे. सदरची कारवाई ही एसीबीचे डीवायएसपी बाळकृष्ण हनकुडे, घोलप, बागलाने, बरकडे, नदीम, खेत्रे आदींनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या