Thursday, April 25, 2024
Homeनगरपहिल्याच दिवशी एक लाख लिटर दारूची विक्री

पहिल्याच दिवशी एक लाख लिटर दारूची विक्री

सर्वाधिक विक्री ‘देशी’ची तर 32 हजार 543 लिटर बिअर नगरकरांनी रिचवली

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन घोषणेनंतर प्रदीर्घ काळापासून बंद असणारी जिल्ह्यातील दारू दुकाने मंगळवार (दि.5) अटी शर्तीसह खुली झाली. या पहिल्या दिवशी जिल्ह्यात 1 लाख लिटर दारूची विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुत्रांनी दिली. यात सर्वाधिक विक्री ही देशीदारूचा समावेश असून एका दिवसात नगरकरांनी 37 हजार 810 लिटर देशी दारू रिचवली आहे.

- Advertisement -

करोना संसर्ग गडद झाल्याने आधी राज्य सरकारने आणि त्यानंतर केंद्र सरकारने दोन टप्प्यात लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे जिल्ह्यातील दारू दुकानांचे शटर बंद झाली होती. साधारण 40 दिवसांहून अधिक दिवस दारूची दुकाने बंद होती. हे दुकाने राज्य सरकारने अटी शर्तीसह आणि सामाजिक अंतराचे भान ठेवून सुरू करण्याचे आदेश दिले. त्यातही दुकान उघडण्याचा कालावधी हा सकाळी 10 ते सायंकाळी 5 असा होता.

पहिल्याच दिवशी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी तळीरामांनी गर्दी केल्याने काही तासामध्ये दारूचे दुकाने बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. मात्र, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील तळीरामांनी 1 लाख लिटर दारू रिचवली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यात देशी दारूची 37 हजार 810 लिटर, विदेशी दारू 28 हजार 91 लिटर, बिअर 32 हजार 534 लिटर आणि 893 लिटर वाईनचा यात समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या