Type to search

Featured नाशिक

वणी येथे मोबाईल दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान

Share

वणी | वार्ताहार

येथील वणी बस स्थानक नजिक असलेल्या जगदंबा स्विट मार्ट व शेजारील सुमित विश्वासराव गांगुर्डे यांचे मोबाईल दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची माहीती मिळाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक सदर दुकानातून धुर निघत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी सदर दुकानदारांना पाचारण केले व घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मिठाई दुकानात फ्रिज, डिप फ्रिज, मिठाई, खाद्य पदार्थ व फर्निचर असे सुमारे तिन ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या आगीचे वृत्त समझताच वणी ग्रामपालिकेच्या टँकरच्या मदतीने ग्रामस्थांनी आग विझविली. घडलेल्या दुर्दैवि घटनेबदल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून हतबल झालेले मिठाई दुकानदार व मोबाईल दुकानदार शासकिय मदत मिळेल का ? अशा आशेवर आहे. सदर आग ही शॉट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!