Type to search

Featured नाशिक

टाकेद येथे घराला भीषण आग

Share

टाकेद | शाहाबाज शेख

टाकेद गावातील रहिवासी मधुकर पाबलकर यांच्या घराला आज सकाळच्या सुमारास आग लागली होती. आग लागण्याचे कारण देवासमोर ठेवलेली पंती नळलाच्या पोत्यावर पडून त्यामुळे आग लागली होती.

आग लागताच गावातील मुलांनी पाबलकर यांच्या घरातील साहित्य व दुकानातील किराणा माल काढून सुरक्षित ठिकाणी हळवले आणि
आग विझवण्यासाठी टाकेद गावातील ग्रामस्थांनी मोठे साहाय्य केले होते.

गावातील रतन बांबले, अस्लम शेख, शाहरूख शेख, शिशांत नाईक, नंदू जाधव, विजय बांबले, संतोष बांबले, बापू जाधव, किशोर पवार, विक्रम गोडे, प्रसाद कदम, गणेश दुर्गुडे व ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणली. तसेच सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

आगीमुळे कोणतेही जीवितहानी झालेली नाही पण पाबलकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग विझवल्यानंतर ग्रामस्थांनी पाबलकर यांच्या परिवाराला धीर देत जळालेल्या घराची साफ सफाई करण्यास सुरवात केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!