Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकेंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाचे राहुल गांधीं कडून स्वागत

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाचे राहुल गांधीं कडून स्वागत

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्या थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणात मोठा बदल केला आहे. भारताच्या शेजारील देशांना आता भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

भारताला ज्या देशांच्या सीमा लागून आहेत अशा देशातील कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती भारतातील कोणत्याही क्षेत्रात आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच गुंतवणूक करू शकेल असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन मंडळाकडून सांगण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचे राहुल गांधी यांच्या कडून देखील स्वागत करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या