Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशफास्टॅग 15 दिवस मिळणार मोफत

फास्टॅग 15 दिवस मिळणार मोफत

नवी दिल्ली – फास्टॅगचा वापर वाढवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 15 दिवसांसाठी फास्टॅग फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. फास्टॅग मिळवण्यासाठी 100 रुपयांची फी आकारली जाते. परंतु, 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत हे शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या नजिकच्या कोणत्याही केंद्रात जाऊन अगदी मोफत हे फास्टॅग मिळवू शकता.

यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या गाडीचं आरसी बूक दाखवावं लागेल. सरकारनं देशातील 52 हून अधिक राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग आधारीत टोल टॅक्स कलेक्शन यंत्रणा सुरू केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्गावरील कोणताही टोल प्लाझा, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामान्य सेवा केंद्रे, परिवहन केंद्रे आणि पेट्रोल पंप अशा कोणत्याही ठिकाणावरून तुम्ही ही मोफत फास्टॅग मिळवू शकाल. तुमच्या नजिकच्या फास्टॅग विक्री केंद्राची माहिती घेण्यासाठी माय फास्टॅग ऍप किंवा www.ihmcl.com किंवा 1033 या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकाल.

डिजिटल पद्धतीनं वसुली वाढणार –

टोल टॅक्स प्लाझावर फास्टॅगच्या आधारे डिजिटल पद्धतीनं वसुली वाढवण्यासाठी ही सुविधा सरकारनं दिली आहे. कोणतीही इच्छुक व्यक्ती आपल्या वाहनाच्या वैध रजिस्ट्रेशनसोबत कोणत्याही केंद्रावरून फास्टॅग मोफत मिळवू शकतील, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या