Saturday, April 27, 2024
Homeनगर7 हजार शेतकर्‍यांची नावे पोर्टलवर जुळेना !

7 हजार शेतकर्‍यांची नावे पोर्टलवर जुळेना !

पी.एम. किसान योजनेच्या लाभासाठी आधारकार्ड अपडेट करा- तहसीलदार प्रशांत पाटील

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत प्रत्येक शेतकर्‍याला वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र तालुक्यातील 7 हजार शेतकर्‍यांचे आधार कार्डवरील नाव पोर्टवरील नावाशी जुळत नसल्याने हे 7 हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा संबंधित शेतकर्‍यांनी आपले आधारकार्ड अपडेट करून घ्यावे, असे आवाहन श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत प्रत्येक शेतकर्‍याला वार्षिक 6 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेध्ये सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांनी आपली संपूर्ण माहिती, आधारकार्ड, बँक खाते क्रमांक आणि पासबुकची छायांकित प्रत, भ्रमणध्वनी क्रमांक घोषणापत्र अशा विविध कागदपत्रांची पूर्तता ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे केलेली आहे. मात्र काही शेतकर्‍यांचे आधारकार्डवरील नाव पोर्टवरील नावाशी जुळत नसल्याने शेतकर्‍यांना 2 हजार रुपयांची मदत येण्यास अडचणी येत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा (2 हजार रुपये) लाभ घेत असलेल्या तालुक्यातील सुमारे 7 हजार शेतकर्‍यांचे आधारकार्डवरील नाव पोर्टलवरील नावाशी जुळत नसल्याने त्याची खात्री झालेली नाही. असे सर्व शेतकरी या योजनेचा पुढचा हप्ता मिळण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्यांने आपले आधार अपडेट करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

यासाठी आपल्या मोबाईलच्या इंटरनेटवर जाऊन www.pmkisan.gov.in या साईटवर जाऊन नंतर उजव्या हाताला दिसणार्‍या Farmers Corner वर Click करावे. त्यात Edite Adhar Failure Record  यावर Click करून पुढे येणार्‍या पानावर आपला आधारकार्ड क्रमांक टाकावा. त्यानंतर उरिींलहर समोरच्या बॉक्समधील अक्षरे टाईप करुन ीशरीलह करावे. पुढे खाली आलेल्या नावासमोर Captcha या बटन वर Search करून आपले आधारकार्डवरील नावाप्रमाणेच नाव टाईप करावे व सबमिट करावे. आपले खाते आधीच अचूक असेल तर Edit चा पर्याय येणार नाही. यात कोणतीही अडचण असल्यास नजिकच्या CSC केंद्रावर जाऊन अथवा तहसील कार्यालयात स्थापन पी.एम. किसान मदत केंद्रात जाऊन दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन प्रशांत पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या